महाभारतातील कथा – डॉ गौरी मोघे

Current Status Not Enrolled Price ₹1,500.00 Get Started orLog In महाभारतातील कथा – … “गोष्टी” सांगेन युक्तीच्या चार! – डॉ […]

Current Status
Not Enrolled
Price
₹1,500.00
Get Started
or

“न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार|”, असे म्हणून भगवान् कृष्णाने युद्ध न करता युद्ध जिंकले ते ह्या युक्तीच्या चार गोष्टी पांडवांना सांगूनच. ‘युक्ती’ म्हणजे जे जिथे जोडायचे आहे, ती योजना. आणि महाभारताच्या ख-या उपदेशाशी वाचकांना जोडण्यासाठी व्यासांनी योजलेली युक्ती म्हणजे ही अमोघ कथा. महाभारत ही खरे तर एक प्रदीर्घ गोष्ट आहे ज्यामध्ये अनेक गोष्टी अर्थात् ‘कथा’ आहे. म्हनूनच कथांची कथा असलेल्या ह्या महाभारतकथेत अनेक गोष्टी अशा आहेत ज्याबद्दल निश्चितच ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ अशी प्रचीती येते. कधी मुख्य कथेत तर कधी त्या अनुषंगाने येणा-या कथांमध्ये वेगवेगळे तपशील येतात, सुरस, चमत्कारिक आणि वास्तविकही! धर्म सांगता सांगता सहजच ह्या कथा महाभारताचे आणि मानवी जीवनाचे मर्म सांगून जातात आणि वाचकाला आशय आणि विषयाची गोडी लावून एक संपन्न अनुभव देतात. महाभारतातील अशाच काही निवडक कथा प्रस्तुत व्याख्यानमालिकेच्या सूत्रात गुंफल्या आहेत डॉ. गौरी मोघे यांनी. या दहा व्याख्यानांमधून काही परिचित, अपरिचित तर काही अल्पपरिचित कथा आणि त्यांची योजना याविषयी जाणून घेऊया या व्याख्यानमालिकेतून – “महाभारतातील कथा – गोष्टी सांगेन युक्तीच्या चार”

नल-दमयंती (भाग-१)

नल-दमयंती (भाग-२)

सावित्रीचे उपाख्यान : मृत्युंजया सावित्री

गोष्ट एका गरुडाची: सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी

कथा गुरुशिष्यांची : कुंभारासारखा गुरु नाही रे जगात

अम्बेचे उपाख्यान -: फिरुनी नवी (?) जन्मेन मी!

प्राण्यांच्या गोष्टी -: शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा!

ऋषींच्या गोष्टी -: ‘रचिल्या ऋषी – मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत’ !

नर – नारायणाची गोष्ट : नरवर कृष्णासमान !

कथा गौतमीची-: पूर्तता माझ्या ‘कथेची’ !

Shopping Cart
Scroll to Top