संस्कृत साहित्यक्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविणार्या कवींमध्ये पंडितराज जगन्नाथाचे नाव अग्रगण्य मानले जाते. जगन्नाथाच्या काव्यकृतींमध्ये सर्वाधिक परिचित रचना ‘गंगालहरी’ ही आहे. देवनदी गंगेवर रचलेलं हे स्तोत्र पीयूषलहरी या नावानेही प्रसिद्ध आहे. या स्तोत्रांत बावन्न श्लोक असून, त्यांत गंगेच्या लोकोत्तर अशा विविध गुणांचे वर्णन व स्वतःच्या उद्धाराविषयी कळवळ्याची प्रार्थना आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून, दशमीपर्यंत ‘गंगादशहरा’ हा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. कित्येक भाविक या काळांत गंगालहरीस्तोत्राचा नित्यपाठ करतात. जाणून घेवूयात या गंगालहरी स्तोत्रामध्ये दडलेलं शब्दार्थांचे व भक्तिभावाचे सौंदर्य तसंच गंगामैय्याचे माहात्म्य.
गंगालहरी – १ – पार्श्वभूमी – आणि श्लोक १ – ३
गंगालहरी -२ – श्लोक ४ – १३
गंगालहरी – ३ – श्लोक १४ – २०
गंगालहरी – ४ – श्लोक २१ – ३१
गंगालहरी – ५ – श्लोक ३२ – ४०
गंगालहरी – ६ – श्लोक ४१ – ५२
Reviews
There are no reviews yet.