‘महाभारत’ हे भारतीय महाकाव्य. ह्या महाकाव्याला जसे ‘जय नामो इतिहासोऽयम्’ म्हटले जाते तसेच ह्या महाकाव्याने इतिहास घडवला. ‘जय’ नावाचा हा कुरुवंशाचा इतिवृत्तान्त अवघ्या ८,००० श्लोकांचा , त्याच ग्रंथाची १,००,००० श्लोकांची म्हणून ‘शतसाहस्री’ अशी संहिता तयार झाली. आणि भारतीयांसाठी महाभारत ही परंपरा झाली ग्रांथिक, मौखिक आणि सांस्कृतिक. या व्यासप्रणीत महान् काव्याने भारत देशाच्या भारतीयत्वाचा अर्थ सांगितला. महाभारताने एक मोठा चित्रपट उभा केला ज्या चित्रामध्ये अनेक व्यक्तिरेखांनी रंग भरले, रंगांच्या विविध छटा ह्या कथापटावर आकारल्या. केवळ मनुष्य नाही तर देवता, नद्या, यक्ष, गंधर्व, असुर, सर्प, पक्षी इ. पात्रांना सुद्धा ह्या महाकथेमध्ये विशिष्ट भूमिका आहेत. वेगवेगळ्या व्यक्तींच्या वागण्यातून, परिस्थितीमधून, निर्णयांमधून, प्रत्यक्ष युद्धातील घटनांमधून धर्म बघताना असा साहजिक प्रश्न पडतो की हा महाभाताचा धर्म आहे की धर्माचे महाभारत! कधी दैव तर कधी प्रयत्न म्हणजे पुरुषकार अशा विषयांमधील द्वैताच्या प्रवासात महाभारत नक्की कुठल्या अज्ञाताकडे निर्देश करते, हे समजून घेण्यासाठी आवश्यकता आहे ती विचारमंथनाची. म्हणूनच करुया हे “महाभारत-मंथन”.
(अभ्यासक्रम (१० तास)
1. महाभारताची संरचना
2. महाभारत चिकित्सक आवृत्ती : व्यासपर्व ते ध्यासपर्व
3. उपाख्याने : बिंबाचे प्रतिबिंब
4. महाभारताचे अद्भुत – I – देवता
5. महाभारताचे अद्भुत – II – यक्ष, अप्सरा, दैत्य, नाग
6. महाभारताचे द्वैत : दैव अन् पुरुषकार , आचार-विचार, सार-असार
7. महाभारतातील युद्ध : कालाय तस्मै नम:
8. धर्मो रक्षति रक्षितः! – महाभारताचा ‘धर्म’ की ‘धर्माचे’ महाभारत
9. महाभारताचा उपदेश : इच्छा>ज्ञान>क्रिया
10. महाभारतातील कृष्ण : तुज सगुण म्हणू की निर्गुण रे ||
Reviews
There are no reviews yet.