आदिशक्तीच्या उपासकांमध्ये त्यांतही विशेषत्वे श्रीविद्या उपासना संप्रदायामध्ये सौंदर्यलहरी हे स्तोत्र सुप्रसिद्ध आहे. आद्य शंकराचार्यांनी या स्तोत्राची रचना केली असे मानले जाते. आदिशक्तीच्या ‘केशादिपादान्त’ वर्णनाबरोबरच तिच्या कुलकुंडलात्मक, मंत्रात्मक, यंत्रात्मक अशा नानाविध रूपांचे वर्णन या स्तोत्रामध्ये येते. देवीउपासनेमधील अनेक गूढगम्य ‘प्रमेय’ या स्तोत्रामध्ये प्रासादिक काव्यात्मक रूपामध्ये मांडलेली आहेत. तर अशा या सर्वांगसुंदर स्तोत्राचा अभ्यासकांना, देवी उपासकांना परिचय व्हावा यासाठी ‘ ज्ञानयात्रा ‘ घेवून येत आहे – ‘सौन्दर्यलहरी चिन्तनिका’
Reviews
There are no reviews yet.