
देवताष्टक म्हणजे काय ?
‘देवताष्टक’ हा संस्कृत साहित्यातील एक महत्वाचा स्तोत्रप्रकार आहे. ‘अष्टक’ म्हणजे आठ श्लोकांचा समूह. एखाद्या विशिष्ट देवतेचे स्वरूप, गुण, कार्य, तत्त्वज्ञान आणि भक्तिभाव यांचे वर्णन आठ श्लोकांत केले जाते, त्याला देवताष्टक असे म्हणतात. अनेक अष्टकांमध्ये शेवटी फलश्रुतीही दिलेली असते.
या विशेष ऑनलाईन कार्यशाळेत डॉ. अंबरीष खरे देवताष्टकांची संकल्पना, त्यांची रचना, ऐतिहासिक पार्श्वभूमी, प्रतीकात्मक अर्थ, भारतीय तत्त्वज्ञानाशी असलेला संबंध तसेच मूर्तिशास्त्रीय संदर्भ यांचे सविस्तर आणि अभ्यासपूर्ण विवेचन करणार आहेत. देवताष्टकांमधील प्रत्येक श्लोकामागील तत्त्वविचार, उपासनेतील महत्व आणि भारतीय संस्कृतीतील त्यांचे स्थान यांचा उलगडा या व्याख्यानातून होईल.
भारतीय धर्म, संस्कृत साहित्य, मूर्तिशास्त्र, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांची आवड असलेल्या प्रत्येक अभ्यासक, विद्यार्थी आणि रसिकांसाठी ही ऑनलाईन कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरेल.
